उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर; शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार?

शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रयतेचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होत असल्याने या निमित्ताने शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करत सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Ex MP Shivajirao Adhalrao Giving Memorandum to CM Uddhav Thackeray About Shivenri Fourt
Ex MP Shivajirao Adhalrao Giving Memorandum to CM Uddhav Thackeray About Shivenri Fourt

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने हिच ती वेळ हि टॅग लाईऩ वापरत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा प्रचार करत, अखेर काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.  मुख्यमंत्री झाल्यावर शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता शिवनेरीवर यायचे नक्की झाले असून, गुरुवारी ता.12 मुख्यमंत्री शिवनेरीवर येणार आहेत.

शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रयतेचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होत असल्याने या निमित्ताने शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची कर्जमाफी  करत सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. नेमक्या याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहे. मुख्यमंत्री म्हणुन पहिल्यांदाच येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व आहे. हा दौरा ऐतिहासीक ठरावा म्हणु न कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तसेच ठाकरे हे गड किल्ले प्रेमी असून गड किल्ले संवर्धनासाठी आग्रही आहेत. राज्य शासनाच्या वतीने 2002 पासून शिवनेरी संवर्धन आणि विकास सुरु आहे. यामुळे हा किल्ला किल्ले संवर्धनाचा माॅडेल ठरला असल्याने या माॅडेलचा राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी जुन्नरची सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेसह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे 2007 पासून करत आले आहेत. यामागणीचे निवेदन आढळऱाव यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तर शिवनेरीवरील अंबरखाना इमारती मध्ये सातवाहन आणि शिवकालीन वस्तु संग्रहालयाची देखील मागणी सह्याद्रीसह आढळराव पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या दोन्ही मागण्या मंजुरीची घोषणा देखील मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.

रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करा

शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारण्याची मागणी माजी खासदार आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी  पुर्ण होऊ शकली नाही. हिच मागणी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेट घेऊऩ केली आहे. यावेळी क्लस्टर आणि शिवनेरी वरील संग्रहालयाबाबत  ठाकरे यांनी विशेष रस दाखवत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सुचना प्रशासनाला केल्याचे आढळराव पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com