मुख्यमंत्र्यांच्या चौकशीने शिवभोजन घेणाऱ्या नाडेंच्या डोळ्यात आनंदाश्रू!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वकिल संघाच्या परिषदेच्या कार्यक्रमानंतर वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटाने चालविलेल्या शिव भोजन केंद्रास आज दुपारी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अन्‌ नेते, पोलिसांची धावपळ यात काय होतेय हे समजण्याआधीच श्री. ठाकरे यांनी थेट केंद्रात प्रवेश केला
CM Uddhav Thackeray Visited ShivBhojan Centre at Nashik
CM Uddhav Thackeray Visited ShivBhojan Centre at Nashik

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकहून परततांना त्यांनी आज वडाळा नाका चौकातील शिवभोजन केंद्राला भेट दिली. यावेळी जेवन घेणाऱ्या तुकाराम नाडे यांची हात जोडून विचारपुस केली. "जेवण चांगले आहे का? आवडले का? काही सुचना आहे का?," अशी विचारणा केली. थेट राज्याचा मुख्यमंत्रीच विचारणा करतोय हे पाहून नाडे सद्गगदीत झाले. त्यांनी डोळ्यातील आनंदाश्रुंसह समाधान व्यक्त करीत तृप्त आर्शिवाद दिले. हा प्रसंग पाहून उपस्थितही काही काळ भारावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वकिल संघाच्या परिषदेच्या कार्यक्रमानंतर वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटाने चालविलेल्या शिव भोजन केंद्रास आज दुपारी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अन्‌ नेते, पोलिसांची धावपळ यात काय होतेय हे समजण्याआधीच श्री. ठाकरे यांनी थेट केंद्रात प्रवेश केला. यावेळी तिथे काही लोक जेवण घेत होते. प्रत्येकाकडे जाऊन त्यांनी चौकशी केली. यावेळी सर्वात शेवटी जेवण घेणारे याच भागातील तुकाराम नाडे यांच्याकडे ते गेले. त्याची विचारपूस केल्यावर जेवण आवडले का? काही हवे का? जेवण कसे आहे? काही सूचना आहेत का? असे प्रश्न केले. 

थेट मुख्यमंत्रीच चौकशी करीत असल्याने श्री नाडे थोडेसे हादरलेच. पाण्याचा घोट घेऊन त्यांनी होकारार्थी मान हलवली. "जेवण लई चांगले आहे'' असे सांगतांना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी ठाकरेंना आर्शिवाद दिले. यावेळी येथील वातावरण अगदीच भावनिक झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बचत गटाच्या महिलांनाही वाढताना हात अखडता घेऊ नका. चांगले जेवण वाढा, अशी सूचना केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसिलदार पंकज पवार, बचतगट अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com