CM Uddhav Thackeray Silent on Nanar Project
CM Uddhav Thackeray Silent on Nanar Project

नाणार रिफायनरीवर मुख्यमंत्र्यांचे मौन; सेनेच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण

नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शनिवारी (ता. 16) शिवसेनेच्या मुखपत्रात सकारात्मक जाहिरात पहिल्या पानावर प्रसिध्द झाली होती. त्यानंतर शिवसेनेच्या रिफायनरी विरोधातील भूमिकेबाबत प्रकल्प विरोधकांमध्ये साशंकता व्यक्‍त केली जाऊ लागली

रत्नागिरी : शिवसेनेच्या मुखपत्रात आलेली नाणार रिफायनरीची सकारात्मक जाहिरात, राजापूर तालुक्‍यातील संघटनांसह अनेकांनी प्रकल्प व्हावा यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रकल्प विरोधकांकडून घेतली जात असलेली भूमिका या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमिका मांडतील अशी अटकळ होती; ती फोल ठरली. मेळाव्यातही ठाकरे यांनी नाणारवर भाष्य करणे टाळले. मुख्यमंत्र्यांचे मौन आणि पत्रकारांशीही वार्तालाप न साधताच ते सिंधुदुर्गकडे रवाना झाल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रमाचेच वातावरण आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शनिवारी (ता. 16) शिवसेनेच्या मुखपत्रात सकारात्मक जाहिरात पहिल्या पानावर प्रसिध्द झाली होती. त्यानंतर शिवसेनेच्या रिफायनरी विरोधातील भूमिकेबाबत प्रकल्प विरोधकांमध्ये साशंकता व्यक्‍त केली जाऊ लागली. भाजपा सत्तेत असताना शिवसेनेने राजापूर तालुक्‍यातील रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने एक पाऊल मागे घेतले होते. शिवसेना सत्ताधारी झाल्यानंतर काही महिन्यातच रिफायनरीची सकारात्मक जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सर्वांचेच डोळे विस्फारले. राजापूर तालुक्‍यातील प्रकल्पाच्या बाजूने असलेल्या काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा कोकण दौऱ्यापूर्वी दोन दिवस आधी जाहिरात आल्यामुळे प्रकल्पाविषयी काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा बांधली जात होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सोमवारी (ता. 17) दुपारी साडेबारा वाजता गणपतीपुळे येथे दाखल झाले. त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन विकास कामांची भूमिपुजने केली. त्यानंतर मेळाव्याला उपस्थिती लावली; परंतु दहा मिनिटांच्या भाषणामध्ये नाणार रिफायनरीचा साधला उल्लेखही केला नाही. त्यामुळे विरोधकच नव्हे तर समर्थकांचीही निराशा झाली. मुख्यमंत्र्यांनी फक्‍त कोकणाला लाभलेल्या निसर्ग सपन्नतेचा वारसा कसा जपायचा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पत्रकारांशी संवाद न साधताच पुढे रवाना झाले.

नाणार संपलेला विषय : विनायक राऊत

मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला नसला तरीही शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी मात्र नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाला असून हा आता संपलेला विषय असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, जे शिवसैनिक किंवा शिवसेनेचे पदाधिकारी नाणार प्रकल्पासाठी आग्रही असतील त्यांच्या पक्ष कारवाई करेल. नाणार प्रकल्पाची दलाली करणारे शिवसैनिक नाहीत. प्रकल्प रद्द झाला असून तो उकरून काढण्याचा मुद्दा नाही.े

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com