सोनिया - उद्धव यांच्यात फक्त किमान समान कार्यक्रमावर चर्चा?

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रथमच भेट घेतली. त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे,खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हेही होते
Uddhav Thackeray Meets Sonia Gandhi in New Delhi
Uddhav Thackeray Meets Sonia Gandhi in New Delhi

मुंबई : सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका थोडी वेगळी असली तरी राज्यातील सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमावर भर देण्याबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाल्याचे शिवसेनेच्या मोठया नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाचे अधिकार हिरावले जाऊ नयेत, म्हणून पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यावर राज्य समन्वय समिती निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना शुक्रवारी आश्वस्त केल्याचे या नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रथमच भेट घेतली. त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे,खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हेही होते. 

तासभर चाललेल्या या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे यावेळी आभार मानले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावरच सरकार वाटचाल करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत उत्तम समन्वय असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.

ठाकरे यांनी नवीन कायद्याचा योग्य अभ्यास करावा : तिवारी

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएचा योग्य अभ्यास करावा, असा सल्ला कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचे जाहीर समर्थन करु नये असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्यांबाबत चर्चा झाली. सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. तर राष्ट्रीय जनगणना नोंदणी अर्थात एनपीआरबाबत देशाची जनगणना दर दहावर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो धोकादायक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

यावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री मनिष तिवारी यांनी ट्‌विट करुन उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती कायदा -2003 ची माहिती घेणे आवश्‍यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसेच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवे, कारण धर्म हा नागरिकत्वचा आधार असू शकत नाही, असे मनिष तिवारी म्हणाले.

कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे विचार वेगळे असले तरी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार काम करेल - बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com