एनआयएकडे तपास सोपवण्यास विरोध करणे कायदयानुसार कठीण?

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या निर्णयाला कायदयातील तरतुदींनुसार विरोध करणे जवळपास अशक्‍य असल्याचे महाराष्ट्रातील नोकरशाहीने स्पष्ट केले असल्याचे समजते
CM Uddhav Thackeray Discuss NIA issue with Senior Officers
CM Uddhav Thackeray Discuss NIA issue with Senior Officers

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या निर्णयाला कायदयातील तरतुदींनुसार विरोध करणे जवळपास अशक्‍य असल्याचे महाराष्ट्रातील नोकरशाहीने स्पष्ट केले असल्याचे समजते. एनआयए कायदयातील कलम सहानुसार तपास वर्ग झाल्यानंतर संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमणे शक्‍य आहे काय याचाही तपास सुरू असून काही कायदेतज्ज्ञांच्या मते याचेही उत्तर नकारार्थी आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात नेमके काय करायला हवे या बददल मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुमारे दोन तास चर्चा केली. मुख्य सचिव, गृह खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळणारे अतिरिक्‍त मुख्य सचिव पोलिस महासंचालक या तिन्हीही महत्वाच्या व्यक्‍तींशी आज याबाबत सर्वंकष विचारविनिमय करण्यात आल्याचे समजते. एनआयए कायदयात गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदलानुसार तपास वर्ग करण्यास विरोध करण्याची कोणतीही तरतूद शिल्लक राहिलेली नाही. सरकारशी संबंधित काही महत्वाच्या मंत्र्यांनी एखादे प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर नियम 10 अन्वये ते वर्ग करणे अयोग्य असल्याची तरतूद या कायदयात आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

मात्र, यासंबंधी खरी तरतूद काय त्याचा अभ्यास केला जातो आहे असे समजते. भीमा कोरेगावमधील मूळ घटना ,त्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची असणारी गुंतवणूक तसेच त्यानंतर राज्यात उसळलेला हिंसाचार या तीन वेगवेगळ्या घटना मानून त्यांचा स्वतंत्र तपास करावा काय याबददलही विचार सुरू आहे असे उच्चपदस्थांनी स्पष्ट केले. तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय लादला गेला तरी एसआयटी नेमली जाईलच, अशी भूमिका उर्जामंत्री कॉंग्रेस नेते आणि दलितांच्या हक्‍कांसाठी राष्ट्रीय स्तरावर सक्रीय असलेल्या डॉ. नितीन राउत यांनी घेतली आहे. 

त्यांनी जाहरिपणे तसे विधानही केले आहे. मात्र, तपास एनआयएकडे घेणारे केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातही कठोर पावले उचलणार काय अन केंद्र-राज्यातले ताणलेले संबंध भीमा कोरेगावप्रकरणात अधिकच ताणायचे काय, असा प्रश्‍नही समोर येणार आहे. गृहखात्यातील काही महत्वाचे अधिकारी काल सहाव्या माळ्यावर उपस्थित होते. पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या दिल्ली आयुक्‍तपदावरील संभाव्य प्रतिनियुक्‍ती विषयीही या वेळी चर्चा झाली असावी, असा कयास करण्यात येतो आहे. 

काल नागपूर येथे मेट्रोचे उदघाटन तसेच नियोजनविषयक बैठकांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख दिवसभर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत होते. आज कॅबिनेट बैठकी दरम्यान यासंबंधी सविस्तर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्रीउदधव ठाकरे यांनी तपास, एनआयएबददलच्या सर्व बाबी समजून घेतल्या असून राज्याचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांचे मतही मागवण्यात आले आहे.

अदयाप पत्र नाही : गृहमंत्री अनिल देशमुख
या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "अदयाप एनआयएचे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. कायदेशीर बाबी तपासणे सुरू असून योग्य तो निर्णय घेतला जाईल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com