मुख्यमंत्र्यांचा आमदार शेखर निकम यांना फोन; कोरोनाचा घेतला आढावा 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना फोन करून स्वतःची आणि मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्याची सूचना केली.
CM Uddhav Thackeray Called Shekhar Nikam About Corona
CM Uddhav Thackeray Called Shekhar Nikam About Corona

चिपळूण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना फोन करून स्वतःची आणि मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्याची सूचना केली. 'मातोश्री'वरून निकम यांचे निवासस्थान असलेल्या 'राधा गोविंद' येथे थेट मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यात कोरोनाची साथ पसरल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. प्रशासकीय पातळीवर शक्‍य आणि आवश्‍यक त्या सर्व उपायोजना मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत त्याच बरोबर महाविकास आघाडीतील आमदारांना प्रत्यक्ष फोन करून मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आमदार निकम रविवारी दिवसभर प्रशासकीय कामाचा आढावा घेत होते रात्री नऊ वाजता ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर मातोश्रीवरून कॉल आला.

थेट मातोश्रीवरून आणि रात्री आलेला कॉल पाहून निकम यांना धक्काच बसला निकम यांनी कॉल घेतला समोरून मुख्यमंत्र्यांनी मी उद्धव ठाकरे बोलतोय...असे सांगत निकम यांच्याकडून चिपळूण संगमेश्वर आणि देवरुख मधील परिस्थितीचा आढावा घेतला कोरोनाची साथ असताना निकम शक्‍य ते प्रयत्न करून मतदार कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपायोजना करत आहेत त्याबद्दल ठाकरे यांनी निकम यांचे कौतुक केले त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या अशी सूचनाही केली.

निकम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना मुंबई आणि पुण्यात अडकलेल्या चाकरमान्यांना परत गावी येण्यासाठी दोन दिवसाची संधी द्या, अशी मागणी केली. तसेच जे लोक मुंबई पुण्यामध्ये राहणार आहेत त्यांचे प्रश्न त्याच ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाबंदी असल्यामुळे चाकरमान्यांचे प्रश्न ते राहत असलेल्या ठिकाणी सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी निकम यांना दिले.

चिपळून संगमेश्वर आणि देवरुख मध्ये प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे पोलीस आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत मुख्यमंत्र्यांनी फोन करून या सर्व कामाची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे चाकरमान्यांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा निघेल अशी आशा आहे - शेखर निकम आमदार चिपळूण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com