घोटी पोलिसांनी वाचवले 13 जणांचे प्राण वाचवले़, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

महामार्गावर घोटी तपास नाक्‍यावर टेम्पोला आग लागली. यावेळी घोटी वाहतूक पोलिस पथकाने वेगाने मदतकार्य करीत तेरा प्रवाशांना जीवनदान दिले. ट्‌विटरवरील या व्हीडीओची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली
CM Uddhav Thackeray Aplauded Traffic Police Work
CM Uddhav Thackeray Aplauded Traffic Police Work

नाशिक : महामार्गावर घोटी तपास नाक्‍यावर टेम्पोला आग लागली. यावेळी घोटी वाहतूक पोलिस पथकाने वेगाने मदतकार्य करीत तेरा प्रवाशांना जीवनदान दिले. ट्‌विटरवरील या व्हीडीओची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. या 'जीवनदूत' पथकाला पुरस्कार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठ थोपटत प्रोत्साहन दिले आहे.

या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व त्यांच्या पथकाकडून महामार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून अपघातमुक्त महामार्ग करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते सातत्याने प्रबोधन करीत आहेत. यासाठी गेल्या तीन महिन्यात त्यांनी तीन हजार युवकांचे मेळावे घेऊन त्यांना महामार्गावरील वाहतुक सुरक्षेविषयी टिप्स देत मार्गदर्शन केले आहे. त्यात विविध संस्था, शैक्षणीक संस्थांचाही सहभाग घेतला.

नोव्हेंबर महिन्यात मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या प्रवाशी टेम्पोला हॉटेल ग्रीनलॅड हॉटेल समोर आग लागली होती. यामध्ये तेरा प्रवाशी जीवाच्या आकांताने जीव वाचविण्यासाठी मदत मागत होते. वाहतूक महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे तपासणी नाक्‍यावर उपस्थित असतांना घटना त्यांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेत धूर व आगीचे लोळ बाहेर पडत असलेल्या वाहनातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले होते. घटनेची दखल घेत ट्‌विटरच्या माध्यमातून पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री यांना टॅग करत घटनेचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाला होता. त्याची दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. 

याबाबत अपर पोलीस महासंचालक वाहतूक ( महाराष्ट्र ) विनय कारगावकर यांनी घटनेची दखल घेत याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे शिफारस केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पथकाचे कौतुक केले.

राज्यात प्रथमच घोटी टेपच्या महामार्ग वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे सोमवारी जमशेदजी शिएटर येथे जीवनदूत पुरस्काराने सन्मानित केले. 

घोटी टेपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय हिरे, पोलीस हवलदार संजय क्षीरसागर, विक्रम लगड, चेतन कापसे, जितेंद्र पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गावर सातत्याने नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या घोटी टेपच्या पोलिसांचा सत्कार जीवन दूत पुरस्काराने करत पोलिसांच्या धाडसाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com