Uddhav Thackeray announces Closure of All Shops in Maharashtra
Uddhav Thackeray announces Closure of All Shops in Maharashtra

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व सक्तीने 'बंद' : मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात जीवनावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना सक्तीने बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे

मुंबई : कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात जीवनावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना सक्तीने बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. बँका सुरु राहणार असल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, ''सरकार केवळ आपल्यासाठी निर्णय घेत आहे. संपूर्ण जगाला घरात रहावे लागते आहे. पुढचे १५ दिवस खूप काळजी घ्यावी लागेल. चित्रपट सृष्टीतले कलाकारही मदतीसाठी पुढे आले आहेत. त्या सगळ्यांचे आभार मानतो. कोरोनाच्या संकटावर निश्चित मात करु.'' फक्त  सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती २५ टक्के असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. ही सुटी दिलेली नाही, हे अंगावर टाकलेले एक बंधन आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे असेही ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com