cm thakrey congrets ghoti police | Sarkarnama

तेरा जणांचे प्राण वाचविणाऱ्या घोटी पोलिसांची मुख्यमंत्री ठाकरेंनी थोपटली पाठ 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

नाशिक : महामार्गावर घोटी तपास नाक्‍यावर टेम्पोला आग लागली. यावेळी घोटी वाहतूक पोलिस पथकाने वेगाने मदतकार्य करीत तेरा प्रवाशांना जीनदान दिले. ट्‌विटरवरील या व्हीडीओची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. या "जीवनदूत' पथकाला पुरस्कार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाट थोपटली आहे. 

नाशिक : महामार्गावर घोटी तपास नाक्‍यावर टेम्पोला आग लागली. यावेळी घोटी वाहतूक पोलिस पथकाने वेगाने मदतकार्य करीत तेरा प्रवाशांना जीनदान दिले. ट्‌विटरवरील या व्हीडीओची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. या "जीवनदूत' पथकाला पुरस्कार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाट थोपटली आहे. 

या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व त्यांच्या पथकाकडून महामार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून अपघातमुक्त महामार्ग करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते सातत्याने प्रबोधन करीत आहेत. यासाठी गेल्या तीन महिन्यात त्यांनी तीन हजार युवकांचे मेळावे घेऊन त्यांना महामार्गावरील वाहतुक सुरक्षेविषयी टिप्स देत मार्गदर्शन केले आहे. त्यात विविध संस्था, शैक्षणिक संस्थांचाही सहभाग घेतला. 

नोव्हेंबर महिन्यात मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या प्रवाशी टेम्पोस हॉटेल ग्रीनलॅड हॉटेल समोर आग लागली होती. यामध्ये तेरा प्रवाशी जीवाच्या आकांताने जीव वाचविण्यासाठी मदत मागत होते.

वाहतूक महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे तपासणी नाक्‍यावर उपस्थित असतांना घटना त्यांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेत धूर व आगीचे लोळ बाहेर पडत असलेल्या वाहनातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले होते. 

घटनेची दखल घेत ट्‌विटरच्या माध्यमातून पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री यांना टॅग करत घटनेचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाला होता. त्याची दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत विनय कारगावकर अपर पोलीस महासंचालक वाहतूक ( महाराष्ट्र ) यांनी घटनेची दखल घेत याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे शिफारस केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पथकाचे कौतुक केले. 

राज्यात प्रथमच घोटी टेपच्या महामार्ग वाहतूक पोलिसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे सोमवारी जमशेदजी थेटर येथे जीवन दूत पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी वालझाडे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय हिरे, पोलीस हवलदार संजय क्षीरसागर, विक्रम लगड, चेतन कापसे, जितेंद्र पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख