शरद पवारांच्या खोलीत मुख्यमंत्र्यांचा मुक्काम!

शरद पवारांच्या खोलीत मुख्यमंत्र्यांचा मुक्काम!

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपाचे अलिकडच्या काळातील राजकीय विरोधक शरद पवार यांच्याच खोलीत काल महाजनादेश यात्रेसाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम ठोकला. पण हे खरे आहे!

कोल्हापूरच्या दौऱ्यात ज्या हॉटेलमध्ये श्री. पवार नेहमी उतरताच त्याच हॉटेलमधील श्री. फडणवीस यांचे वास्तव्य आज सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरले.

कोल्हापूर आणि श्री. पवार यांचे अतूट असे नाते आहे. श्री. पवार हे केंद्रात किंवा राज्यात मंत्री असोत किंवा नसोत ज्या ज्यावेळी ते कोल्हापुरात आले, त्या त्यावेळी अनेकदा त्यांचा मुक्काम हा ताराराणी चौकातील हॉटेल पंचशीलमध्येच राहिला आहे. त्यातही या हॉटेलची 402 क्रमांकाची खोली त्यांच्यासाठी आरक्षित असल्यासारखी स्थिती होती. सरकारमध्ये असताना एखादा शासकीय कार्यक्रम असो किंवा नसताना महापुरासारख्या आपत्तीतील दौरा श्री. पवार आणि कोल्हापूर जसे नाते घट्ट तसेच हॉटेल पंचशील, तेथील खोली क्रमांक 402 हे नातेही घट्ट आहे.

महाजनादेशा यात्रेसाठी काल रात्री उशिरा कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याच हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. विशेष म्हणजे तेही खोली क्रमांक 402 मध्येच उतरले होते. याची माहिती बाहेर येताच सोशल मिडीयावर मात्र यासंदर्भातील मजकुरांनी एकच चर्चा सुरू झाली. "पवार यांच्या हॉटेलमधून यात्रेला सुरूवात, पवारांच्या खुर्चीचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आशिर्वाद, `राज्यात पवार सोडून राजकारण करता येत नाही' यासारख्या संदेशांनी दिवसभर धमाल उडवून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com