CM is Shifting Major Defence Projects to Nagpur Alleges MP Hemant Godse | Sarkarnama

खासदार गोडसेंचा आरोप; "मुख्यमंत्री फडणवीसांचा अजब न्याय, प्रकल्प नागपुरला नेऊन  दत्तक नाशिकला करताहेत कंगाल'' 

संपत देवगिरे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प आहेत. संरक्षण क्षेत्राला लागणारी विविध उत्पादने येथे तयार होतात. गेली पंधरा वर्षे येथे डिफेन्स क्‍लस्टर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दर्जाचा तोफखाना प्रशिक्षण केंद्र, आर्टीलरी सेंटर, हवाई दलाचे मेंटेनन्स सेंटर, एच.ए.एल, डीआरडीओ अशा विविध अनुषंगीक संस्था आहेत. गतवर्षी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकला डिफेन्स क्‍लस्टर करणार अशी घोषणाही केली होती. मात्र, सध्या अचानक हे क्‍लस्टर नागपुरला हलविल्याची चर्चा सुरु आहे.

नाशिक : "नाशिककरांची मते घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्ष कारभार करताना मात्र वेगळेच चित्र आहे. नाशिकला होऊ घातलेला 'डिफेन्स क्‍लस्टर' आता नागपुरला होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दत्तक घेतलेल्या नाशिकला प्रकल्पांच्या दृष्टीने कंगाल करु पहात आहेत," असा आरोप शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे. 

नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प आहेत. संरक्षण क्षेत्राला लागणारी विविध उत्पादने येथे तयार होतात. गेली पंधरा वर्षे येथे डिफेन्स क्‍लस्टर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दर्जाचा तोफखाना प्रशिक्षण केंद्र, आर्टीलरी सेंटर, हवाई दलाचे मेंटेनन्स सेंटर, एच.ए.एल, डीआरडीओ अशा विविध अनुषंगीक संस्था आहेत. गतवर्षी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकला डिफेन्स क्‍लस्टर करणार अशी घोषणाही केली होती. मात्र, सध्या अचानक हे क्‍लस्टर नागपुरला हलविल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत थेट संरक्षण मंत्री व संरक्षण राज्यमंत्र्यांना त्याबाबत नापसंती कळविली आहे. 

याबाबत खासदार गोडसे म्हणाले, "केंद्र शासनाने 'एम्स'ची घोषणा केल्यावर त्याची सर्व तयारी आम्ही केली होती. नाशिकच्या संस्थांनी त्याबाबत होकार देत अनुकुलता व सुविधांची उपलब्धता केली. मी स्वतः याबाबत राज्य शासनाने नाशिकचे नाव सुचवावे अशी विनंती केली होती. मात्र, तो प्रकल्प नागपुरला नेला. त्यानंतर 'नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल रिसर्च' संस्था नाशिकला शक्‍य होती ती देखील नागपुरला नेली. हे 'मिसयुज ऑफ पॉवर आहे,' दत्तक घेतलेल्या नाशिकला कंगाल करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी थांबवावे." 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख