मुख्यमंत्री करणार पूरग्रस्त कराडची पहाणी

जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कराड येथील पुराचे पाणी आता ओसरु लागले असून सहा हजार पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले आहे. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती ची पाहणी करण्यासाठी उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विजय शिवतारे कराडला येणार आहेत. राज्यातील पुरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री करणार पूरग्रस्त कराडची पहाणी

सातारा : जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कराड येथील पुराचे पाणी आता ओसरु लागले असून सहा हजार पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले आहे. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती ची पाहणी करण्यासाठी उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विजय शिवतारे कराडला येणार आहेत. राज्यातील पुरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. 

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य ते निर्णय घ्यावे. पुर ओसरताच रोगराई पसरण्याचे प्रमाण खूप असते रोगराई पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम करावे. पुरांमुळे पाण्याचे स्त्रोत दुषीत झाले असून नागरिकांना पिण्यासाठीस्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कराड आणि पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हालवण्याचे व त्यांना इतर मदत ही टीम करीत आहे. जिल्हयातील 90 गावे पुरग्रस्त असून 5 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याने  कराड तालुक्यातील 4 हजार 258, पाटण तालुक्यातील 786, फलटण तालुक्यातील 549, सातारा तालुक्यातील 465, महाबळेश्वर तालुक्यातील 161 व जावली तालुक्यातील 43 असे एकूण 6 हजार 262 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले आहे. 

कराड आणि पाटणमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरफीची व त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. पुरपरिस्थिती थोडी कमी होत असून रोगराई पसरणार नाही यासाठी आता जिल्हा प्रशासन काम करणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com