शिवसेना सोडलेल्या हाजी अराफत शेख यांना मुख्यमंत्री ठाकरेंनी भेटही नाकारली

अचानक शिवसेना सोडून भाजपशी सलगी केलेल्या नेत्यांबद्दल उद्धव ठाकरे कठोर असल्याचे या प्रसंगातून दिसून येत आहे.
hazi arafat sheikh resigns
hazi arafat sheikh resigns

मुंबई : शिवसेनेचा त्याग करून थेट भाजपमध्ये जाऊन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद घेणाऱ्या हाजी अराफत शेख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली. ही भेट नाकारल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे सोपविला. 

हाजी शेख हे शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. तत्कालीन परिहवनमंत्री दिवाकर रावते आणि त्यांचे अजिबात पटत नव्हते. त्यावरून मातोश्रीवर बैठकाही झाल्या होत्या. माझ्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याची शेख यांची तक्रार होती.

या नाराजीतून त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. भाजपने त्यांचा फायदा घेत त्यांच्यावर अल्पसंख्याक आयोगाची जबाबदारी देत मंत्रिपदाचाही दर्जा दिला. ते संपूर्ण राज्यात फिरले आणि अनेक बैठका घेत अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. आयोगाच्या कामाचा आढावा घेणारा अहवाल त्यांना मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा होता. त्यासाठी ते गेले आठवडाभर भेटीसाठी प्रयत्न करत होते. मात्र शिवसेना सोडून गेलेल्या शेख यांना तातडीने भेट देण्याचे ठाकरे यांनी नाकारल्याचे दिसून येते. त्यामुळे नाराज झालेल्या शेख यांनी पदाचा राजीनामा दिला.  त्यांनी आज मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे राजीनामा सोपविला. भेट नाकारल्याबद्दल त्यांनी राजीनामा पत्रात नाराजीही व्यक्त केली.

भाजप सरकारने विविध महामंडळे, आयोग यावर केलेल्या नि्युक्त्या रद्द करण्याचा निर्णय नवीन सरकार लवकरच घेणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच शेख यांचे पद जाणार होते, अशी चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com