'बागडेंना आशिर्वाद द्या', असे फडणवीस म्हणाले आणि नानांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

haribhau_bagade.
haribhau_bagade.

औरंगाबादः महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांना त्यांचे नाव घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आशिर्वाद देण्याचे आवाहन केले. बागडे, सावे, दानवे, रहाटकर आणि मलाही आशिर्वाद द्या अशी साद मुख्यमंत्र्यांनी सभेला उपस्थित असलेल्या गर्दीला घातली.

उपस्थितांनी देखील हात उचांवत मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर आवाहनाने व्यासपीठावर बसलेल्या विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या  चेहऱ्यावर हास्य फुलले !  

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मतदारसंघातून जाणार आहे. आज शहरातून ही यात्रा गेल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात जाणार आहे. हरिभाऊ बागडे यांना आदराने आणि प्रेमाने सर्वजण नाना म्हणतात .  यात्रेच्या स्वागताची आणि सभेची जय्यत तयारी बागडे यांनी मतदारसंघात केली आहे. या तयारीवर ते स्वःत लक्ष ठेवून आहेत. शहरातून निघालेल्या रोड शो आणि सभेत देखील बागडे उपस्थित होते. 

या सभेच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागडे यांच्यासह भाजप नेते आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेऊन त्यांना आशिर्वाद देण्याचे आवाहन केले. त्यामुळे हरिभाऊ बागडे चांगलेच सुखावल्याचे दिसले. गेल्या काही महिन्यांपासून आगामी विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून बागडे यांना उमेदवारी मिळणार नाही अशा चर्चांना जोर आला आहे. 

बागडे यांचे वाढते वय लक्षात घेता यावेळी पक्ष त्यांना तिकीट नाकारणार अशी चर्चा अनेकजण करीत होते . त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्‍यता मुख्यमंत्र्यांच्या आजच्या आवाहनाने निर्माण झाली आहे.

आपल्या अर्ध्या तासाच्या  भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी हरिभाऊ बागडे, अतुल सावे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, प्रशांत बंब यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आशिर्वाद देणार का? असा सवाल उपस्थितांना केला होता. त्यावर सगळ्यांनी अगदी हात उंचावून "हो' म्हणत प्रतिसाद दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com