शरद पवार यांची माघार हा भाजप-सेनेचा विजय : फडणवीस यांचा दावा

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यातही भाजपने यावर विजयाचा दावा करत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे.
शरद पवार यांची माघार हा भाजप-सेनेचा विजय : फडणवीस यांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या गोटात यावरून आनंदाचे वातावरण पसरले आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांची माघार हा शिवसेना-भाजप युतीसाठी विजय असल्याचा दावा केला आहे. मोदी साहेबांनी पवार साहेब हवा का रुख भाप लेते है, असे सांगितले होते. त्यानुसार शरद पवार यांनी राजकीय वाऱ्याचा अंदाज घेतला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही या निर्णयावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी एक महिन्यांपूर्वी माढा लोकसभा लढविण्याची तयारी दाखवत सभा घेतल्या. माढा मतदारसंघातील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्याची नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी उमेदवारी माघार का घेतली हे माहीत नाही. मात्र त्यांनी माघार घेतल्याने भाजपचा हा पहिला विजय झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजप वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, जेथून निवडणूक लढविण्यासाठी सांगतील तेथून मी निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com