जाळपोळ करण्यात राजकीय पक्षांचा  सहभाग, मुख्यमंत्र्यांकडून विरोधक लक्ष्य 

  जाळपोळ करण्यात राजकीय पक्षांचा  सहभाग, मुख्यमंत्र्यांकडून विरोधक लक्ष्य 

मुंबई : शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोण राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत आहे. याची इत्थंभूत माहिती आपल्याकडे आहे. कालचा (सोमवारी) महाराष्ट्र बंदही राजकीय हेतून प्रेरित होता. मी असे म्हणत नाही की त्यामध्ये शेतकरी नव्हते. पण, जाळपोळ करण्यात राजकीय पक्षच होते असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, "" शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आपण कुणाही सोबत चर्चा करण्यास तयार आहोत. ही चर्चा मात्र जो खऱ्या अर्थाने शेतकरी आहे. ज्याला शेतकऱ्याविषयी कणव आहे अशा मंडळींशीच चर्चा करण्यास तयार आहे. मात्र राजकीय हेतूने जे चर्चा करण्यास येतील त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास आपणास स्वारस्य नाही. महाराष्ट्र बंदमध्ये राजकीय मंडळींचा सहभाग होता हे दिसून येत आहे. बंदला हिंसक वळण कोणी दिले. कोणी जाळपोळ केली. कोणी दगडफेक केली याची माहिती आपल्याकडे आहे.'' 

राज्यातील 307 पैकी 300 बाजार समित्यांचे कामकाज काल सुरू होते. केवळ तीनच समित्यांचा संपात सहभाग होता याकडे लक्ष वेधत फडणवीस म्हणाले, "" बाजार समित्यांतर्फे 85 टक्के आवक झाली आहे. केवळ 15 टक्के आवक ही संपामुळे होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आपली चर्चा करण्याची केंव्हाही तयारी आहे. मात्र त्यामध्ये राजकारण आणू नये अशी आपले म्हणणे आहे. अल्पकर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. 31 ऑक्‍टोबरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाईल.'' 

काही राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले. कालच्या बंदमध्ये रास्ता रोको करणारे कोण होते याची कंपलीट माहिती आपल्याकडे असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com