मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिवतारेंसाठीच्या गौरवोद्गाराची चर्चा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिवतारेंसाठीच्या गौरवोद्गाराची चर्चा

सासवड ः गुंजवणीच्या पाण्यासाठी विजय शिवतारे यांनी उपोषण केल्यानंतर त्यांची किडनी खराब झाली. कोर्टकचेऱयात कामाला इथल्या मंडळींनी विरोध केला. विजयबापूंना अनेकदा त्यांना त्रास झाला. पण उद्या ज्यावेळी इथल्या शेतात पाणी खेळेल त्यावेळी शिवतारेबापुंचं नाव पुरंदरच्या इतिहासात पुढची १०० वर्ष जिवंत राहील., असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच संपूर्ण सभास्थळ हेलावून गेलं. आज पुरंदर - हवेली विधानसभा मतदार संघातील गावोगावी हीच चर्चा आहे. 
 
सासवडला मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. त्यावेळी खुद्द श्री. शिवतारे यांनी काँग्रेस नेत्यांनी गुंजवणीत कसे अडथळे आणले याची पुस्तिका वाटली.

ते म्हणाले, मी उपोषणात माझी किडनी खराब केली. तर हे म्हणतात. हा रात्रीचा टाकतो, त्यामुळे किडनी खराब झाली. तुम्हाला ही पण अक्कल नाही, टाकतो त्याचे लिव्हर खराब होते. मी सुपारी देखील खात नाही हे उभ्या तालुक्याला माहित आहे. पण सांगतो की, हे काँग्रेसवाले गुंजवणीच्या पाण्यात कितीही अडथळे आणतात हे जनतेने बारकाईने पहा. माझी किडनी खराब झाली.. ह्दयाला त्रास होतोय. गुंजवणीचे पाणी येईपर्यंत मी जगणार आहे. मग नंतर किडनी, ह्दय यांनी साथ सोडली तरी मी गुंजवणीच्या पाण्यातून फुललेल्या पिकातून माझ्या शेतकऱयांशी व जनतेशी बोलेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सासवडच्या कालच्या जंगी सभेने काल सासवड चांगलेच दणाणले. पालखीतळ मैदानावर राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठीच्या सभेला प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी होती. युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, परिंचे येथील अजित जाधव आदींच्या भाषणाने सभेत चांगलाच जोश भरला. त्यानंतर जि.प चे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी आपल्या शैलीत कॉंग्रेसला झोडपले. यावेळी मंदार गिरमे म्हणाले, मतदारयादीतून खुद्द राज्यमंत्री शिवतारेंचे नाव उडवण्यात आलं होतं. संजय जगताप आमदार झाले तर लोकांची सातबाऱ्यावरुन नावं उडवतील. ग्रामीण भागातून शहरात येण्या - जाण्यासाठी कॉंग्रेसचे गुंड टोलनाके बसवून खंडण्या गोळा करतील.

हवेली भाजपचे तालुकाध्यक्ष पंडित मोडक म्हणाले, भारतीय जनता पक्ष मजबुतीने शिवतारे यांच्या पाठीशी उभा आहे. कुठल्याही स्थितीत आम्ही हवेलीतून मोठे मताधिक्क्य शिवतारे यांना देणार आहोत. पुरंदरच्या जनतेनेही त्यादृष्टीने कंबर कसावी.

बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, शंकरनाना हरपळे, पंडितदादा मोडक, सचिन लंबाते, गंगाराम जगदाळे, राजेंद्र जगताप, श्रीकांत राऊत, दिलीप यादव, राहुल शेवाळे, सभापती रमेश जाधव, संदीप मोडक, कैलास ढोरे, संगीताराजे निंबाळकर, गिरीश जगताप, धनंजय कामठे, रवींद्र फुले, प्रकाश खेडेकर, सचिन भोंगळे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com