'रोखठोक' लिहायला संजय राऊत आहेत, त्यामुळे काळजी नको : मुख्यमंत्री

शिवसेना भाजप युतीचा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल येथील राका लॉन्स सभागृहात झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांसह प्रमुख पाहुणे होते. युतीचे विविध नेते, मंत्री व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आघाडीवर अतिशय टोकदार शब्दात टीका केली.
'रोखठोक' लिहायला संजय राऊत आहेत, त्यामुळे काळजी नको : मुख्यमंत्री

नाशिक : "सत्तेसाठी आम्ही कधीच युती केली नाही. ही युती देशासाठी आहे. देश फक्त मोदींजीच्या सत्तेतच सुरक्षीत आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. काही लागलेच तर 'सामना' बघुन घेईल. गेले तीस दिवस मी फक्त सामन पेपर वाचतो आहे. लागलेच तर 'रोखठोक' लिहायला आपल्याकडे संजय राऊत आहेत. त्यामुळे या जोरावर उत्तर महाराष्ट्रातील आठ अन्‌ राज्यातील अठ्ठेचाळीस जागा जिंकुन आपण दिल्लीला जाऊ," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

शिवसेना भाजप युतीचा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल येथील राका लॉन्स सभागृहात झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांसह प्रमुख पाहुणे होते. युतीचे विविध नेते, मंत्री व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आघाडीवर अतिशय टोकदार शब्दात टीका केली. ते म्हणाले, "त्यांची आघाडी स्वार्थासाठी आहे. आम्ही मात्र देशासाठी एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी समाजात आघाडीच्या नेत्यांचा चेहरा उघडा करावा. देशातील जनता देशावर प्रेम करते. तीला जागे करा. सत्तेकरीता आम्ही कधीच लढत नाही. सत्ता येते अन्‌ जाते. खुर्चीसाठी आम्ही युती केलेली नाही. आमची युती देशासाठी आहे. त्यात देशाचे भले आहे. आपल्याकडे 'एनडीए' आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मार्गदर्शनासाठी उध्दव ठाकरे आहेत. त्यांच्या हाती देश सुरक्षीत आहे. त्यामुळे चिंता नाही. समजा काही गरज पडलीच तर सोबतीला 'सामना' आहे. त्यामुळे गेले तीस दिवस मी फक्त 'सामना' वाचतो आहे. अन्य काही वाचत नाही. आणखी काही लागलेच तर 'रोखठोक' लिहायला संजय राऊत देखील आहेत. त्यामुळे चिंता नाही. नाशिकच्या आठ आणि राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात आपण जिंकु अन्‌ दिल्लीला जाऊ."

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे यांची भाषणे झाली. राज्यमंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, मिलींद नार्वेकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व्यासपीठावर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com