मुरलीधर मोहोळांच्या होर्डिंगला मुख्यमंत्र्याची दाद

मुरलीधर मोहोळांच्या होर्डिंगला मुख्यमंत्र्याची दाद

पुणे :`` पुण्यनगरीतील कल्पकता ही कायम वाखाणण्यासारखी असते. ढोल ताशाच्या गजराने अवघी पुणे नगरी दुमदुमली होती. या अपार प्रेमाबद्दल आणि दणदणीत प्रतिसादाबद्दल पुणेकरांचा मी अत्यंत आभारी आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "फेसबुक'च्या माध्यमातून पुणेकरांचे आभार मानले आहेत.

आभार मानण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी उभारलेल्या फ्लेक्सचे, स्वागताच्या तयारीचे फोटो वापरले आहेत.  नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी लावलेला एका होर्डींगचा फोटो यात आहे. नगरसेवक धीरज घाटे यांनी उडविलेल्या फुग्यांचाही या ट्विटमध्ये समावेश आहे. नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उभारलेला देखावाही मुख्यमंत्र्यांच्या पसंतीस उतरला आहे.

मोहोळ यांनी उभारलेल्या होर्डिंगमध्ये मुख्यंत्र्यांचा सभेत बोलताना आणि जनसमुदायाला अभिवादन करताना लक्षवेधी वापरण्यात आला आहे. मी पुन्हा येईन, माझ्या महाराष्ट्राला एक नव रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, शहराचा चेहरा बदलण्यासाठी. माझा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम करण्यासाठी, या मुख्यमंत्र्यांनी एका भाषणात वापरलेल्या ओळींचा वापर करण्यात आला आहे.

पर्वती व खडकवासला मतदारसंघात आज मुख्यमंत्र्यांची महाजानेदशा यात्रा होती. खेड शिवापूर परिसरातील रहाटवडे फाटा येथे 100 बैलगाड्याला आल्या होत्या. महाजनादेशच्या एसी बसमधून उतरून मुख्यमंत्री फडणवीस ईश्वर खेडेकर यांच्या बैलगाडीत बसले. लगेच त्यांनी कासरा हाती घेत बैलगाडीचे काही अंतर सारथ्य केले. त्याच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com