आम्ही जनतेचे सेवक आहोत, सेवकच राहू - देवेंद्र फडणवीस

मागील निवडणुकीत आमच्याबरोबर शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि मोदींजीचा आशीर्वाद होता, यावेळच्या निवडणुकीत या दोन गोष्टी तर आमच्याकडे आहेतच पण यावेळच्या निवडणुकीत छत्रपती शिवरायांचे वंशज आमच्याबरोबरआहेत असे त्यांनी उदयनराजे यांचाउल्लेख करून सांगितले.
आम्ही जनतेचे सेवक आहोत, सेवकच राहू - देवेंद्र फडणवीस

नाशिक : आम्हाला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे, आम्ही गेली पाच वर्षे जनतेची सेवा करत आहोत, पुढची पाच वर्षे अशीच जनतेची सेवा करत राहू अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये उपस्थित श्रोत्यांना भाजपला पुन्हा जनादेश देण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी सांगितले की मला राज्यात जनतेचे जे अफाट प्रेम मिळाले ते प्रेम केवळ मोदीजींचे नेतृत्व असल्यामुळेच मिळाले, लोकांना मोदींजींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करेल असा विश्‍वास आहे असे ही त्यांनी सांगितले. 

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती की आमच्याकडे हिशेब लिहायला माणसे होती. या टीकेचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले बरोबरच आहे, तुमच्याकडे हिशेब लिहायला माणसे होती, हिच तुमची राजेशाहीची मानसिकता आहे. तुम्ही लोकांशी सरंजामशाहीने वागलात म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिले, आम्ही सेवा करण्यासाठी आलो आहोत त्यामुळे जनतेला हिशेब देण्याची आमची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. 

आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर भागातल्या पुरस्थितीतील नागरिकांना मदत करण्यासाठी राज्याच्या कुठल्याही भागातील नागरिकांनी कसर ठेवली नाही, दुष्काळी भागातूनही सरकारला चेक देऊन लोकांनी जोरदार मदत केली. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील जनतेने साडेतीन कोटी रुपयांची मदत केली आहे. 

मागील निवडणुकीत आमच्याबरोबर शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि मोदींजीचा आशीर्वाद होता, यावेळच्या निवडणुकीत या दोन गोष्टी तर आमच्याकडे आहेतच पण यावेळच्या निवडणुकीत छत्रपती शिवरायांचे वंशज आमच्याबरोबर आहेत असे त्यांनी उदयनराजे यांचा उल्लेख करून सांगितले. यावेळच्या निवडणुकीत आम्ही स्वप्न पाहत आहोत ते दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे आणि देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेच्या कामात आपला वाटा उचलण्याचा, त्याचरोबर राज्यातील तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी आम्ही पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com