मुदत वाढवून घेतल्याने फडणवीस अद्यापही " वर्षा' बंगल्यातच

मुदत वाढवून घेतल्याने फडणवीस अद्यापही " वर्षा' बंगल्यातच

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. काही माजी मंत्र्यांनीही बंगले सोडण्याची तयारी सुरू केली असली तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस " वर्षा ' बंगल्यातच मुक्‍कामाला आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तेथेच आहे. 

भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांवर सामानाची बांधाबांध सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असून, शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसचे संयुक्‍त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता "वर्षा' हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत. या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील संगणक, झेरॉक्‍स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आले आहे. 

फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात शुकशुकाट आहे. दुसरीकडे, " वर्षा ' या निवासस्थानी त्यांचा अजून काही दिवस तरी मुक्काम आहे. शासकीय नियमानुसार बंगला सोडण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला तीन महिन्यांचा अवधी मिळतो. त्यानुसार सध्या फडणवीस यांना वेळ मिळाला असून, नवे सरकार स्थापन होईपर्यंत ते या निवासस्थानीच असतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com