मुख्यमंत्र्यांचा गावे दत्तक घेण्याचा विरोधकांना सल्ला 
मुख्यमंत्र्यांचा गावे दत्तक घेण्याचा विरोधकांना सल्ला 

मुख्यमंत्र्यांचा गावे दत्तक घेण्याचा विरोधकांना सल्ला 

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील बुरुज आता ढासळत आहेत. एकतरी मतदार संघ आम्हाला ठेवा असे कॉंग्रेसचे नेते म्हणत आहेत. आगामी काळात भाजपचे आमदार, खासदार पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दिसतील. आता आमचे सात आमदार निवडून आले आहेत पुढील वेळी 27 आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

कऱ्हाड (जि. सातारा) : विरोधकांनी आंदोलने करण्यापेक्षा ती ऊर्जा सकारात्मक कामाला लावावी. दोन गावे दत्तक घेऊन तेथे जलयुक्तची कामे करावी, असा सल्ला आंदोलने करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

मलकापूर येथील शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चांद्रकांदादा पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार महेश लांडगे, प्रवक्ते माधव भंडारी, चिटणीस अतुल भोसले, महिला प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, दिलीप येळगावकर, भरत पाटील उपस्थित होते. 

राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक समस्या असून त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे सांगून फडणवीस म्हणाले, शेती हे गुंतवणुकीचे क्षेत्र झाले पाहिजे. या क्षेत्रात 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. बदल होत आहेत, त्यामुळे विरोध करू नका, असा आवाहन त्यांनी केले. सिंचन वाढविण्यासाठी केंद्राकडून 26 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होतील. जिल्ह्यातील वांग मराठवाडी या प्रकल्पाचा त्यात समावेश केला आहे, तो प्रकल्प दीड वर्षांत तो पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. 

मलकापूरच्या सर्व समस्या सोडवू, आणि मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com