मनमाड पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस 

मनमाड शहराला थेट चणकापूर धरणातुन पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. त्यामुळे मनमाड शहराच्या पाणी प्रश्नावर एक पाऊल पुढे पडले आहे.
मनमाड पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस 

नाशिक  : मनमाड शहराला थेट चणकापूर धरणातुन पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. त्यामुळे मनमाड शहराच्या पाणी प्रश्नावर एक पाऊल पुढे पडले आहे. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत विविध स्थानिक नेते व पदाधिका- यांची मनमाड शहराच्या रेंगाळलेल्या पाणी प्रश्नावर बैठक झाली होती. यावेळी थेट धरणातुन १५१ कोटी रूपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्याला मंजुरी मिळावी असा आग्रह सराव नेत्यांनी धरला. याबाबत संबंधितांचे मत लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक झाली. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावर शक्य तेव्हढी जलद कार्यवाहीचे आदेश दिल्याने शहराचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डाॅ भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, सभापती मनिषा पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांसह विविध नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com