cm helicopter security problem | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

हेलिकॉप्टर बिघाडाची पंधरा दिवसांत दुसरी घटना 

सुरेश भुसारी 
गुरुवार, 25 मे 2017

निलंगा येथे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या 15 दिवसांमध्ये घडलेल्या या दोन घटनांमुळे मुख्यमंत्र्यांच्या तैनातीत असलेल्या हेलिकॉप्टरच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी लगेच सुखरूप असल्याचे व्हीडीओ जारी केला तरी हेलिकॉप्टरच्या कार्यक्षमतेबद्दल मात्र प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंधरा दिवसात दुसऱ्यांदा बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरच्या सुरक्षेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या अपघातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याची गेल्या 15 दिवसातील ही दुसरी घटना आहे. गेल्या 12 मे रोजी मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अहेरी येथे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मुख्यमंत्र्यांना अहेरीवरून हेलिकॉप्टरने सावरगाव (जि. नागपूर) येथे जावयाचे होते. तेथे जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. त्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. परंतु अहेरीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ते उडाले नव्हते. अनेकदा प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर न उडाल्याने मुख्यमंत्र्यांनी मोटरने नागपूरकडे रवाना होणे पसंत केले. हेलिकॉप्टरमधील बिघाडाने सावरगाव येथील कार्यक्रम रद्द करावा लागला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख