cm gives jolt to congress in pune | Sarkarnama

मुख्यमंत्री पुण्यात आले आणि काॅंग्रेसला धक्का देऊन गेले!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात पुणे शहरात काॅंग्रेसला मुख्यमंत्र्यांनी धक्का दिला. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघातील काॅंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.

मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराले आले असताना त्यांनी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उरकून घेतला. पुणे शहरातील शिवाजीनगर आणि कॅन्टोंन्मेंट या दोन मतदारसंघातील नाराजांनी भाजपचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे. 

माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी शुक्रवारी सकाळी 9: 30 वाजता विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये करणार प्रवेश आहेत.

आज झालेल्या प्रवेशाच्या वेळी खासदार संजय काकडे, भाजपाचे शिवाजीनगर येथील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे व पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर उपस्थित होते. पुण्यातील कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपाची ताकद आता आणखी वाढली आहे. परिणामी भाजपाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास, संजय काकडे यांनी या वेळी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख