मुख्यमंत्र्यांनी दिली 506 विद्यार्थ्यांना `गूड न्यूज` - cm gives good news to 506 students | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी दिली 506 विद्यार्थ्यांना `गूड न्यूज`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सेवा उत्तीर्ण झालेल्या 506 विद्यार्थ्यांना गोड बातमी दिली. राज्यसेवा 2017 च्या परीक्षेतील 377 आणि 2018 मधील 128 जणांच्या नियुक्तीचा आदेश त्यांनी आज जारी केला.

नियुक्तीची फाईल मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी बोलून या निर्णयास मान्यता घेतली. मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी मुख्यमंत्री  महसूलमंत्री यांचे आभार मानले आहेत.

या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम एकत्र सुरू करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.

राज्य सेवा परीक्षा-2017 च्या निकालाच्या अनुषंगाने  श्रीमती शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक 6578/2018 केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने  दि. 8 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा, 2017 साठी शिफारस करण्यात आलेल्या 377 उमेदवारांची सुधारित यादी 9 सप्टेंबर 2019 रोजी शासनास प्राप्त झाली. हे 377 उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा, 2018 अन्वये  शिफारसप्राप्त 129 असे एकूण 506 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या सर्व उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत रुजू होण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख