मिरगणेंच्या कामावर मुख्यमंत्री खूष! दिला मंत्रीपदाचा दर्जा!

मिरगणेंच्या कामावर मुख्यमंत्री खूष! दिला मंत्रीपदाचा दर्जा!

 मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे (महाहौसिंग) सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

‘प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे (शहरी)’ ही योजना 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. राज्यात या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आला.  

कंपनी कायद्यानुसार हे महामंडळ (महाहौसिंग) जानेवारी 2019 मध्ये नोंदणीकृत करुन कार्यान्वित करण्यात आले. मुख्यमंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष असून गृहनिर्माण मंत्री हे अतिरिक्त अध्यक्ष आहेत. महामंडळाच्या सहअध्यक्षपदी डिसेंबर 2018 मध्ये श्री. मिरगणे यांनी नेमणूक करण्यात आली असून काल त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठ्या प्रामणात घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून डिसेंबर 2019 पर्यंत 5 लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे. याशिवाय पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील 100 गावांमध्ये समुह गृहनिर्माण प्रकल्प (ग्रुप हौसिंग) राबवून स्मार्ट व्हिलेज साकार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिरगणे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे-2022’ या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे (शहरी)’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रासाठी 19.40 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाला राज्यात 5 लाख परवडणारी घरांची निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com