तुम्ही संजयकाकांचे काम करा, संजयकाका तुमचे काम करतील 

लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ.-देवेंद्र फडणवीस
CM & Sanjaykaka
CM & Sanjaykaka

सांगली : लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नाराज आमदारांना ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आणि मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजताच वर्षा बंगल्यावर संजयकाकांची उमेदवारी निश्‍चित झाली. भाजप आमदार विलासराव जगताप यांनी  या घडामोडींचा उलगडा केला. 

संजयकाकांचे नाव भाजपने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नसले तर आज (गुरुवार) सकाळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीची बैठक झाली. संजयकाकांच्या पाठीशी ताकद उभी करून पुन्हा एकदा इतिहास घडवण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. त्याला आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. त्यामुळे संजयकाकांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची केवळ औपचारिकता बाकी असून भाजप त्यासाठी योग्य मुहुर्त शोधत असल्याची चर्चा आहे. 

या घडामोडींवर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिक्कामोर्तब झाले. तेथे या आमदारांसह भाजपचे नेते मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर हेही उपस्थित होते. अर्थातच, खासदार पाटील यांच्या गेल्या पाच वर्षातील भूमिकांवरही सांगोपांग चर्चा करण्यात आली. आमदारांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तर संजयकाकांबद्दलच्या संभ्रमावर बोट मात्र ठेवले. विशेषतः त्यांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या जवळीकीचा विधानसभा निवडणुकीत आम्हाला त्रास नको, अशा आशयाची अपेक्षा आमदारांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. 

आमदार जगताप म्हणाले, "मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता बैठक सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय निवांतपणे आमच्याशी संवाद साधत होते. पावणेअकरापर्यंत चर्चा झाल्या. जतमधील पाणीप्रश्‍नापासून विधानसभेच्या तयारीपर्यंत आम्ही बोललो. या काळात संजयकाकांची उमेदवारी आणि विधानसभेची तयारी या दोन्ही गोष्टींवर भर होताच. मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या परिस्थितीत स्वतः पुढाकार घेतला. संजयकाकांचे काम नेटाने करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. मी आणि चंद्रकांतदादा तसा शब्द देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये वाद किंवा संजयकाकांच्या उमेदवारीला विरोधाचा विषयच नव्हता. काही गोष्टी होत्या, त्या आता संपल्या आहेत. संजयकाकांच्या प्रचारासाठी सारे नेटाने कामाला लागले आहेत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com