मुख्यमंत्र्यांनी घेतला आमदार भालकेंचा पाहुणचार

मागील काही दिवसांपासून शरद पवारांचे खास म्हणून ओळखलेले जाणारे आमदार भारत भालके भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आमदार भालकेंचा पाहुणचार

पंढरपूर : काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून आहेत. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भालकेंच्या घरी भेट देत त्यांचा पाहूणचार घेतला. मुख्यमंत्री आणि आमदार भालकेंच्या भेटीनंतर भालकेंच्या भाजप प्रवेशाला आज अधिकृत पुष्ठी मिळाली आहे.

आमदार भालकेंनी विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्यास, त्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात यावरही भालकेंचे पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पराभव करून ते जायंटकिलर ठरले होते. त्यानंतर 2014 साली  त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेत  प्रशांत परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बरेच पाणी वाहून गेले आहे. विरोधी पक्षात असलेली अनेक मंडळी आज सत्ताधारी भाजप सेनेच्या कळपात दाखल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारत दोन्ही जागावर वर्चस्व निर्माण केले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभेची चाचपणी सुरु झाली आहे. 

पंढरपूर तालुक्यात त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच आज आषाढीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेच्या निमित्ताने पंढरपुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार भालकेंच्या सांगोला रोडवरील बंगल्यावर भेट देवून त्यांचा पाहुणचार घेतला. या दरम्यान आमदार भालके आणि मुख्यमंत्र्यांची बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com