CM fadanvis supports like father : Dawakhare | Sarkarnama

मुख्यमंत्री मोठ्या भावासारखे पाठीशी उभे : निरंजन डावखरे

भरत पचंगे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

शिक्रापूर : डावखरे साहेबांइतकीच ताकद अगदी मोठ्या भावाप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी विधान परिषद निवडणुकीत उभी केली होती. अर्थात आपलं कुणी तरी ऐकतंय आणि त्यावर विचार होतोय हे फक्त भाजपातच होतं याचा अनुभव आपण घेत आहे, अशी भावना विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी येथे व्यक्त केली.

भाजपमध्ये चांगलं आणि मनापासून काम करता येत आहे. अशा कामांसाठी पाठबळ दिलं जातंय. याच खुपच समाधान आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्ष जे सांगेल ते करण्याची तयारी ठेवूनच पक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. 

 निरंजन डावखरे हे विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्या मुळ गावी हिवरे (ता.शिरूर) येथे आले. हिवरेकरांसह शिक्रापूर, सणसवाडी, वाजेवाडी, चौफुला, वढु बुद्रुक, कोरेगाव-भिमा अशा सगळ्याच गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सकाळी हा दौरा प्रारंभ होण्यापूर्वी `सरकारनामा`शी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की  राजकारणात वडील स्व.वसंतराव डावखरे यांचे पदोपदी स्मरण होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांपूर्वी आपण कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. त्यावेळी डावखरे साहेबांचा वचक आणि वलय होते. त्याचा आपल्याला फायदा झाला. मात्र राष्ट्रवादीत असतानाच्या पक्षांतर्गत घडामोडींबाबत वरिष्ठ पातळीवर पण काहीच होत नसल्याने आपल्याला भाजपाचा पर्याय योग्य वाटला.

भाजपमध्ये  मात्र एक जाणवले ते असे की, वडील असतानाची निवडणूक आणि यावेळी वडीलांच्या पश्चात लढविलेली निवडणूक यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या भावासारखी पाठीशी उभे राहिले. त्यांचा हा पाठिंबा खरोखरीच अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्र्यांची राजकीय मुत्सद्देगिरी या निमित्ताने आपल्याला अनुभवायला आली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आपला आणि भाजपा म्हणून पक्षाचा असलेला स्वभाव बळाच मिळताजुळता असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. मात्र आपल्या क्षमतेनुसार येथे काम करायला मिळतेय आणि पक्ष सांगेल ते काहीही करायाला आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख