फडणवीसांचा 18 सप्टेबरला नाशिकमध्ये रोड शो 

फडणवीसांचा 18 सप्टेबरला नाशिकमध्ये रोड शो 

नाशिक : महाजनादेश यात्रेचा समारोप येत्या 19 सप्टेबरला नाशिकमध्ये होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल. त्याच्या वातावरण निर्मितीसाठी सभेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक शहरात रोड शो (18 सप्टेबर) करणार आहे.

त्याचे नियोजन सुरु आहे. या कार्यक्रमास पाच लाख कार्यकर्ते व नागरीकांची गर्दी व्हावी असे नियोजन आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे हे मोठे शक्ती प्रदर्शन होईल. 

यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीपदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहूल आहेर आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या आधी होणारी ही सभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने समारोप होणार आहे. 

विविध भूमिपूजन आणि उद्‌घाटनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भाजपकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील विकासकामांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, बुत समित्या आणि पन्ना प्रमुख या यंत्रणेला या कार्यक्रमाची सुचना देण्यात येईलय या यंत्रणेला सक्रीय करुन गर्दी करण्यात येईल. याशिवाय आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांना गर्दीसाठी जमविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

प्रचारावर फोकस 
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात शहरातील स्मार्ट सिटींतर्गत टायरबेस मेट्रो बस, स्मार्ट रस्त्यासह अनेक कामांचा प्रारंभ होणार आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त 19 सप्टेंबरला भाजपचे एक प्रकारचे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शक्तिप्रदर्शनच होणार आहे. 

भाजप आमदारांना याची जाणीव झाल्याने दुपारनंतर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या कामाच्या पूर्णत्वासाठी लक्ष केंद्रित केले. पंतप्रधानाच्या दौऱ्यानंतर राज्यात लगेचच आचारसंहिता जाहीर होण्याच्या शक्‍यतेने आमदारांनी त्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com