मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांप्रति व्यक्त केली दिलगिरी

मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांप्रति व्यक्त केली दिलगिरी

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांच्या प्रति दिलगिरी व्यक्ती केली. यामागचे कारण होते ते त्यांच्या महाजनादेश यात्रेमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे! भाजप कार्यकर्त्यांना बेकायदा फ्लेक्स लावू नयेत. होर्डिंग लावल्यामुळे कोणालाही तिकिट मिळत नाही, असाही इशारा त्यांनी या निमित्ताने दिला. महाजनादेश यात्रेतील पुण्यातील एक टप्पा काल पार पडल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांची काल पुण्यात महाजनादेश यात्रा होती. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा निघाली. ऐन संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचा मनःस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागला. संपूर्ण पुण्यात वाहनांच्या रांगा या कोंडीमुळे लागला होत्या. पुण्यात मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग आधीच मंदावला आहे. त्यात यात्रेच्या ताफेमुळे भर पडली.

 मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोथरूड मतदारसंघात काल बेकायदा होर्डिंगमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळू शकला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरही त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर बेकायदा होर्डिंग लावू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुण्यात सरकारने 45 हजार कोटी रूपयांच्या निधीची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com