`आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकायचाय'

``नारायण राणेंच्या शाळेत तयार झाल्यामुळे नितेश राणे आक्रमक आहेत; मात्र आता आमच्या शाळेत संयम शिकतील,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवलीत बोलताना सांगितले.
`आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकायचाय'

पुणे - ``नारायण राणेंच्या शाळेत तयार झाल्यामुळे नितेश राणे आक्रमक आहेत; मात्र आता आमच्या शाळेत संयम शिकतील,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवलीत बोलताना सांगितले. 

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी खासदार नारायण राणे, कणकवलीतील भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नितेश राणे यांनी विधानसभेत आक्रमकपणे प्रश्न मांडले. कोकणाचे विषय ते हिरिरीने मांडत. कोकणाच्या विषयावर त्यांची आक्रमकता दिसायची. नारायण राणे यांच्या शाळेत तयार झाल्यामुळे त्यांच्याकडे ही आक्रमकता आहे. आता त्यांना आमच्या शाळेत संयम शिकायचाय. नितेश राणे हे आक्रमक, संयमी, अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे येतील.''

`महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व' असा नारायण राणेंचा उल्लेख करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राणे यांच्या कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्ताराला; तसेच सरकार चालवतानाही होईल. 

या वेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या भाषणाची कॅसेट अजूनही लोकसभेच्या निवडणुकीतच अडकल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीमध्ये कुणीही राहायला तयार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com