हिंदुत्वात असहिष्णुतेला स्थान नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

हिंदुत्व ही व्यापक संकल्पना असून यात असहिष्णुतेला स्थान नाही. सहिष्णुता जेथे संपते, तेथे हिंदुत्व राहत नाही, अशा स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात व्यक्त केले.
हिंदुत्वात असहिष्णुतेला स्थान नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर : हिंदुत्व ही व्यापक संकल्पना असून यात असहिष्णुतेला स्थान नाही. सहिष्णुता जेथे संपते, तेथे हिंदुत्व राहत नाही, अशा स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात व्यक्त केले. 

जागतिक मराठा अकादमीतर्फे आयोजित जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व शेवाळकर बिल्डर्सचे संचालक आशुतोष शेवाळकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

गेल्या काही वर्षांपासून देशात हिंदुत्वाच्या नावावरून अशांतता निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की हिंदुत्वाची संकल्पना स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील जागतिक धर्मसभेतही स्पष्ट केली आहे. भारताच्या भूमीत सर्व धर्माचे लोक येऊन राहिले आहेत. सर्व धर्माचे लोक सुखाने नांदतात, अशा देशातून मी आल्याचे विवेकानंदांनी प्रसिद्ध भाषणात सांगितले होते. हेच खरे हिंदुत्व आहे. यात असहिष्णुतेला कोणताही थारा नाही. ज्यावेळी हिंदुत्वातील असहिष्णुता संपुष्टात येते. त्यावेळी हिंदुत्व राहत नाही.

केवळ आरक्षणाने न्याय मिळणार नाही 
आरक्षणाने सामाजिक न्यायाचा प्रश्‍न सुटू शकत नाही, असे मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. विविध समाज घटकांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. या मागण्या आपल्याला हक्क पाहिजे, या भावनेतून होतात. परंतु आरक्षणातून नोकऱ्यांचा प्रश्‍न सुटणार नाही. सरकारकडे केवळ 10 टक्के रोजगार आहे. उर्वरित 90 टक्के रोजगार हा खासगी प्रतिष्ठानांमध्ये आहे. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आपला समाज आज एका संक्रमणातून जात आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या काही अपेक्षा आहे. देशातील 50 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतील आहे. ही तरूण पिढी आपल्या हक्कासाठी थांबून राहू शकत नाही. परंतु ही संक्रमण अवस्था निश्‍चित जाईल व आरक्षणाच्या मागणीतील तथ्य या समाजाला समजून येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com