cm fadanvis to address rally in baramati on Thursday | Sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस गुरूवारी बारामतीत पवारांना ललकारणार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

बारामती शहर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बारामती विधानसभा मतदारसंघात दोन स्वतंत्र सभा घेणार आहेत.

भाजपचे बारामतीचे विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, चंद्रराव तावरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री गुरुवारी (ता. 17) सकाळी 10 वाजता माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजनजीक असलेल्या मैदानावर सभा घेणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी (ता. 18) दुपारी चार वाजता बारामती शहरातील भिगवण चौकातील शारदा प्रांगण येथे सभा होणार आहे. मुख्यमंत्री मुंबईहून हेलिकॉप्टरने बारामतीला येणार आहेत. माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजनजीक त्यांच्या हेलिपॅडचे काम सुरू झाले असून, बारामतीची सभा उरकून मुख्यमंत्री सातारा, दौंड व इंदापूरला देखील त्याच दिवशी सभा करणार आहेत.

दरम्यान, शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील काय बोलणार याबाबत भाजपसह राष्ट्रवादीच्या गोटातही उत्सुकतेचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांत सध्या जोरदार जुगलबंदी सुरू आहे. खोटा पहिलवान, पोरासोरांकडे मोठ्यांनी लक्ष देऊ नये, अशा अनेक टिप्पण्णा पवार करत आहेत. फडणवीसही आपण मोदींच्या तालमीत तयार झाल्याचे फडणवीस सांगत आहेत. त्यामुळे ते बारामतीत काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख