CM discuss farm loan waiver with Sharad Pawar | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज नवी दिल्लीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत आज चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सराकरने सर्व पक्षांतील नेत्यांशी चर्चा करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यानुसार स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पवार यांच्या 6, जनपथ या निवासस्थानी पोचले. या वेळी दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

याबाबत `सरकारनामा'शी बोलताना श्री. तटकरे म्हणाले, ``शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. सराकरने तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. किमान निकष लावून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ पोचला पाहिजे, याचा आग्रह या बैठकीत धरण्यात आला.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख