मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष घडाळ्यावर !

*
Devendra-Fadnvis-1.
Devendra-Fadnvis-1.

अकाेला :  जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय याेजनांचा अाढावा घेण्यासाठी अालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाज जिल्ह्याचा धावता दाैरा केला.

अाढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, पत्रकार परिषदेत वेळेबाबत काटेकोर असलेल्या मुख्यमंत्र्यांचे घड्याळावरच लक्ष असल्याचे दिसून अाले. त्यामुळे अवघ्या 20 मिनीटांनी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद अाटाेपती घेत पुढील दाैऱ्यासाठी मार्गस्थ झाले.

गेल्या चार महिन्यांपासून दाेन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाैरा कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे अाज येतील उद्या येतील म्हणून शासकीय यंत्रणेसह जिल्ह्यातील राजकीय पक्ष कामाला लागले हाेते. अखेर गुरूवार (ता.14) मुख्यमंत्री अकाेल्यात अाहे. मात्र, विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय याेजनांचा अाढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाण्याची लगबग सुरू झाली.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध याेजनांची अंमलबजावणीची माहिती दिली. अाणि पत्रकारांनी विचारलेल्या चार-पाच प्रश्नांची  उत्तरे त्यांनी दिली. पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री बऱ्याच वेळा हातावर असलेल्या घड्याळाकडे पाहत हाेते. लाेकसभा अाणि विधानसभा निवडणुका एकत्र हाेतील काय? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी उभ्या उभ्याच ‘नाही’ म्हणून देत पत्रकारांना नमस्कार करीत रजा घेतली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com