मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ७८ लाख रूपये

..
Devendra_Fadanvis
Devendra_Fadanvis

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली स्थावर मालमत्ता 3.78 कोटी रूपये नमूद केली आहे.

2014 मध्ये हीच स्थावर मालमत्ता 1.81 कोटी रूपये होती. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या 5 वर्षांत झालेल्या वाढीमुळे स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे.

अमृता फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य 2014 च्या 42.60 लाख रूपयांवरून आता 2019 मध्ये 99.3 लाख रूपये इतके झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे 2014 मध्ये 50 हजार रूपये रोख रक्कम होती, ती आता 2019 मध्ये 17,500 रूपये इतकी आहे. बॅंकेतील ठेवी 2014 मध्ये 1,19,630 रूपयांच्या होत्या, त्या आता 8,29,665 रूपये इतक्‍या झाल्या आहेत.

 अमृता फडणवीस यांच्याकडे 2014 मध्ये रोख रक्कम 20 हजार रूपये होती, ती आता 12,500 रूपये आहे. बॅंकेत ठेवी 1,00,881 रूपये इतक्‍या होत्या, त्या आता 3,37,025 रूपये आहेत. अमृता यांच्या 2014 मधील 1.66 कोटी रूपयांच्या शेअर्सचे मूल्य आता 2019 मध्ये 2.33 कोटी रूपये इतके झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com