मुख्यमंत्री फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा विक्रम मोडला

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा विक्रम मोडला

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज एक विक्रम नोंद झाला आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्यांत फडणवीस आज दुसऱ्या क्रमांकावर पोचले. विलासराव देशमुख यांच्या सलग दिवसांचा विक्रम त्यांनी आज मागे टाकला.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ या पदावर विराजमान होण्याचा मान वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर यापूर्वी विलासरावांचे नाव होते पण आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आज (४ डिसेंबर २०१८) आगेकूच केली आहे!

मुख्यमंत्री सलग कार्यकाळ कालावधी

१) वसंतराव नाईक - ११ वर्षे २ महिने १५ दिवस (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७२)

२)देवेंद्र फडणवीस-    ४ वर्षे १ महिना ४ दिवस   ( ३१ ऑक्टोबर २०१४ पासून आजपर्यंत)

३) विलासराव देशमुख-   ४ वर्षे १ महिना ३ दिवस  (१ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८)

वसंतराव नाईक हे सलग ११ वर्षे दोन महिने आणि पाच दिवस (एकूण ४०९७ दिवस) मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख हे पहिल्यांदा १८ आॅक्टोबर १९९९ रोजी मुख्यमंत्री झाले. त्यांना पहिल्या कारकिर्दीत ११८७ दिवस (१६ जानेवारी २००३ पर्यंत) मिळाले. ते दुसर्यांदा एक नोव्हेंबर २००४ रोजी मुख्यमंत्री झाले. ही कारकिर्द त्यांची अधिक लांब म्हणजे १४९४ दिवसांची ठरली. फडणवीस यांनी विलासरावांच्या सलग १४९४ दिवसांचा विक्रम मोडीत काढून सलग या दिवसापुढेही आपली कारकिर्द आजपासून पुढे सुरू ठेवली आहे.

वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ म्हणजे ४०९७ दिवस मुख्यमंत्री होते. त्या खालोखाल विलासराव यांची कारकिर्द आहे. त्यांचे दोन टर्ममधील मुख्यमंत्रिपदाचे दिवस २५८१ आहेत. शरद पवार हे  चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचा एकूण कार्यकाल हा २४१३ दिवसांचा आहे.  

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे एक ९३३ दिवस (१ मे १९६२ ते १९ नोव्हेंबर १९६२) कार्यरत होते. इतर मुख्यमंत्र्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे

मारोतराव कन्नमवार- ३७० दिवस
शंकरराव चव्हाण (दोन टर्म १६५३ दिवस)
वसंतदादा पाटील (दोन टर्म-१२७८ दिवस)

शरद पवार (चार टर्म २४१३ दिवस)

ए. आऱ. अंतुले- (५८३ दिवस)
बाबासाहेब भोसले (३७७ दिवस)
शिवाजीराव पाटील निलंगेकर (२७७ दिवस)
सुधाकरराव नाईक- (६०८ दिवस)
मनोहर जोशी (१४१९ दिवस)
नारायण राणे (२५९ दिवस)

विलासराव देशमुख (दोन टर्म २६८१ दिवस)
सुशीलकुमार शिंदे (६५१ दिवस)
अशोक चव्हाण (दोन टर्म ६७९ दिवस)
पृथ्वीराज चव्हाण (१४१५ दिवस)

पी. के. सावंत हे २५ नोव्हेंबर १९६३ ते चार डिसेंबर १९६३ असे दहा दिवस हंगामी मुख्यमंत्री होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com