CM Devendra Fadanavis Went to Raj Bhavan | Sarkarnama

भाजपची बैठक संपली; मुख्यमंत्री राजभवनाकडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी व सरकार बनविण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची सुरु असलेली कोअर कमिटीची बैठक सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीत काय निर्णय झाला याबाबत उत्सुकता आहे.

मुंबई : राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी व सरकार बनविण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची सुरु असलेली कोअर कमिटीची बैठक सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीत काय निर्णय झाला याबाबत उत्सुकता आहे.

भाजपला विरोधात बसायचं असेल तर त्यांचं त्यांनी ठरवावं, आम्ही आमच्या मुख्यमंत्री पदावर कायम आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज दुपारी दुसऱ्यांदा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला दिल्लीहून भाजप अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार होते. मात्र, या बैठकीत काय झाले हे अद्याप समजलेले नाही. दुसरीकडे शिवसेनेने आपला मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख