CM Devendra Fadanavis Solapur Tour For Election Campaign | Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणाले,  दिलीपराव तुम्ही प्रचंड मताधिक्याने विधानसभेत याल 

प्रमोद बोडके
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापुरात विमान विमानाने आगमन झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहर मध्यचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप माने, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी महापौर किशोर देशपांडे आदी उपस्थित होते. 

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापुरात विमान विमानाने आगमन झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहर मध्यचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप माने, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी महापौर किशोर देशपांडे आदी उपस्थित होते. 

शहर मध्यमध्ये राबविण्यात येणारी प्रचार यंत्रणा, सद्यस्थिती याबाबतची माहितीही  मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून घेतली. सोलापूर शहरातील महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्‍याने विजयी होतील असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप महायुतीच्या  उमेदवारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. करमाळा, मोहोळ व सोलापूर शहर मध्य मधील उमेदवारांसाठी ही जाहीर सभा होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख