cm declares harshwardhan`s ticket from indapur | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश झाला आणि उमेदवारीही मिळाली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मुंबई : कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश झाला ही आनंदाची गोष्ट आहे असे स्पष्ट करतानाच मागच्या पाच वर्षापासून आम्ही त्यांच्या प्रवेशासाठी डोळे लावून बसलेलो होतो. आज योग्य वेळी प्रवेश झाला. मोठा नेता आल्याने पक्षाला बळकटी मिळाली असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले.

पाटील यांचे स्वागत करताना फडणवीस यांनी तेच भाजपचे इंदापूरमधील उमेदवार असतील, अशी घोषणा केली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने पाटील यांना पुन्हा उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागेल की काय, अशी शंका उपस्थित होत होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती फोल ठरवली.  

पाटील यांनी कॉंग्रेसला रामराम करीत आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आदी नेते उपस्थित होते.

पाटील यांचे पक्षात स्वागत करताना फडणवीस म्हणाले, "आम्ही विरोधी बाकावर असताना पाटील यांच्याशी आमचे चांगले संबंध होते. सर्वांशी त्यांचे चांगले जमायचे. सरकारमध्ये त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम प्रत्येकालाच आपले वाटते. सर्व आव्हानाना सरकार सामोरे जाताना प्रत्येकाला न्याय देण्यावरच सरकारचा भर आहे. इंदापूरमधील पाण्यासह ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लावल्या जातील.'' 

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख