`मुख्यमंत्र्यांनी सांगलीला उद्या येताना `कडकनाथ'चे पैसे घेऊन यावे' 

"मुख्यमंत्री साहेब, सांगलीला येताना `कडकनाथ'चे पैसे घेऊन या नाही तर येऊ नका," असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

पुणे- "मुख्यमंत्री साहेब, सांगलीला येताना `कडकनाथ'चे  पैसे घेऊन या नाही तर येऊ नका," असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

सांगली जिल्ह्यात उद्या महाजनादेश यात्रा येत आहे. त्या पाश्वभूमीवर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले.

"कडकनाथ कोंबड्यांत ज्यांनी पैशांची गुंतवणूक केली आहे, ते सगळे शेतकरी आहेत. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांनी पै-पै करून जमवलेले कष्टाचे पैसे `कडकनाथ'मध्ये गुंतवले आहेत. या शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. कडकनाथ कोंबडीचा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे. `कडकनाथ'वरून राजकरण सुरू झाले आहे. शेतकरी आम्हाला न्याय मिळेल म्हणून डोळे लावून बसले आहेत. पुढाऱ्यांचे दरवाजे ठोठावत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातील एकही नेता आवाज काढत नाही. ते का गप्प आहेत?"

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगलीला येत आहेत. त्यांनी येताना मोकळे येऊ नये. शेतकऱ्यांचे पैसे घेऊन यावे. नाही तर येऊ नये," असे पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com