CM Change rumors from the BJP _Maratha Kranti Morcha | Sarkarnama

#MarathaKrantiMorcha मुख्यमंत्रीपदाच्या वावड्या भाजपमधूनच?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

आंदोलनाचा प्रश्‍न हाताळण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना अपयश आले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षांची मागणी सुरू असताना भाजपमधूनच मुख्यमंत्री बदलाच्या मागणीच्या बातम्या पद्धतशीर सोडल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मुंबई - राज्यात उसळलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरीही त्यांच्या खुर्चीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येते. मराठा आंदोलन हाताळण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना अपयश आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या भाजपतीलच काही जण सोडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

आंदोलनाचा प्रश्‍न हाताळण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना अपयश आले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षांची मागणी सुरू असताना भाजपमधूनच मुख्यमंत्री बदलाच्या मागणीच्या बातम्या पद्धतशीर सोडल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या रंगल्या असल्या तरीही त्यांच्या खुर्चीला धोका नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय सांगतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोपर्यंत वरदहस्त आहे, तोपर्यंत फडणवीस यांच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. तसेच या चार वर्षांत अगदी अलीकडे झालेली पालघर लोकसभेची पोटनिवडणूक ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. यामुळे त्यांच्या स्थानाला कोणताही धोका नाही असे निकटवर्तीय सांगतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख