cm cevendra fadanvice in pimpri evening | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री पवारांना लक्ष्य करणार की प्रलंबित प्रश्‍नावर बोलणार ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पिंपरी ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज सायंकाळी येत आहेत. ते पुन्हा एकदा पवार घराण्यावर टीका करणार की शहरातील कचरा, पाणी, अनधिकृत बांधकामे,शास्तीकर,वाढती गुन्हेगारी व त्यातही महिलांवरील अत्याचार,रेडझोन आदी प्रलंबित प्रश्‍नावर बोलणार याकडे शहरवासियांची अपेक्षा आहे. 

शहरात युतीत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पिंपरी राखीव मतदारसंघात भाजप नगरसेवकाने बंड केले आहे.तर दुसऱ्याने अमरावती जिल्ह्यात दर्यापूर मतदारसंघात बंडाचा झेंडा फडकावला आहे.त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे शहरातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.कारण त्यांच्यानंतर उद्या शहरात होणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत बंडखोरांवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

भाजपचा उमेदवार असलेल्या चिंचवडमध्ये शिवसेनेच्या पालिका गटनेत्याने केलेल्या बंडखोराची हकालपट्टीची घोषणा या सभेत ठाकरे करण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे भाजपही अशी कारवाई आपल्या बंडखोरांवर करण्याचे धाडस दाखवेल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. 

सकाळी सोलापूर व दुपारी सातारा जिल्ह्यात प्रत्येकी दोन अशा चार सभा घेऊन मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडला सायंकाळी पाचव्या सभेसाठी येत आहेत.तत्पूर्वी ते भोसरीत भाजपचे उमेदवार महेशदादा लांडगे यांच्या मतदारसंघात रोड शो करतील. नंतरच्या सभेत गेल्या पाच वर्षात न सुटलेल्या व जटील झालेल्या शास्ती,अनधिकृत बांधकामे,गुन्हेगारी, पाणीटंचाई, कचराकोंडी यावर बोलावे, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख