`भाजपने धनगर समाजाला पहिला खासदार दिला; प्रश्नही सोडविणार`

`भाजपने धनगर समाजाला पहिला खासदार दिला; प्रश्नही सोडविणार`

केडगाव : "मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी, आरक्षणाबद्दलची आस्था, पाण्याबाबतची तळमळ पाहून हे प्रश्न तेच सोडवू शकतात. भाजपने धनगर समाजाला पहिला खासदार दिला. एकाच वेळी दोन कॅबिनेट मंत्री दिले. आरक्षणाचा प्रश्न 90 टक्के सोडविला. कमळाचे बटन दाबून धनगर समाज याची परतफेड नक्की करेल,'' असा विश्वास भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी व्यक्त केला आहे. बोरीपार्धी (ता. दौंड) येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार राहुल कुल म्हणाले, ""सरकारने समाजाला देऊ केलेले एक हजार कोटी रुपये नेमक्‍या व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे. या समितीवर आनंद थोरात यांना घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले आहे. यापुढे धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारच्या बैठकांना थोरात यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.''

""मुळशीचे पाणी दौंड तालुक्‍यात आणणे हे आपले स्वप्न आहे. हे पाणी कसे वळविता येईल याबाबत एक सरकारी समिती आहे. त्यावर भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक महेश भागवत यांना घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. पाणी आणि आरक्षणाबाबत थोरात व भागवत यांना सरकारच्या माध्यमातून मी न्याय व सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी आनंद थोरात, महेश भागवत, राजाराम तांबे आम्ही वेगवेगळ्या पक्षांत राहिलो असलो, तरी विकासाबाबत आमचे नेहमी एकमत राहिले आहे,'' असे कुल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com