मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजपा खासदार-आमदारांना २१ तारखेला बोलाविले अर्जंट मुंबईत 

देशातील लोकसभा निवडणूकांचे निकाल २३ तारखेला लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या गुहेत समाधिस्त होण्यासाठी गेले असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणूकीची रणनिती आखण्यासाठी राज्यातील सर्व भाजपा आमदार-खासदारांना निकालापूर्वी दोन दिवस आधी मुंबईत बोलावले असून तसे निरोप सर्व भाजपा आमदार खासदारांना पोहचले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजपा खासदार-आमदारांना २१ तारखेला बोलाविले अर्जंट मुंबईत 

शिक्रापूर : देशातील लोकसभा निवडणूकांचे निकाल २३ तारखेला लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या गुहेत समाधिस्त होण्यासाठी गेले असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणूकीची रणनिती आखण्यासाठी राज्यातील सर्व भाजपा आमदार-खासदारांना निकालापूर्वी दोन दिवस आधी मुंबईत बोलावले असून तसे निरोप सर्व भाजपा आमदार खासदारांना पोहचले आहेत. 

लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रीया पूर्ण होत नाही तोच राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे लगेच पडघम वाजयला सुरवात झालेली आहे. युती-आघाडीतील सर्व विधानसभा इच्छुकांना युती-आघाडीच्या उमेदवारांसाठी पूरेपूर वापरुन घेतल्यावर त्या प्रत्येक इच्छुकाच्या इच्छांना लगेच उधान आले आणि मतदान प्रक्रीया पूर्ण होताच सर्वांनीच आपापली तोंडे उघडायला सुरवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता निकालाची २३ तारीख अगदी जवळ येवू ठेपली असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यमान भाजपा आमदार-खासदारांना मुंबईत दि.२१ रोजी बोलाविले असून बैठकीतील कुठलेच विषय सांगण्यात आलेले नाहीत. 

सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत सलग सहा तासांच्या या मॅरेथॉन बैठकीत नेमके काय चर्चिले जाणार याची माहिती कुणालाही दिली गेली नाही. सदर बैठकीबाबत भाजपाच्या दोन आमदारांनी दुजोरा दिला असून बैठकीतील विषयाबाबत काहीच न कळविता बोलाविलेल्या बैठकीमुळे आम्ही संभ्रमात असल्याची माहितीही दोघांनी दिली. 

पुण्याच्या पालकमंत्र्यांचा निर्णय होणे अपेक्षित?
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची लोकसभेतील इंट्री जवळपास निश्चित समजली जात असल्याने पुण्याच्या पालकमंत्र्यांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता भाजपा संघटना व पक्षपातळीवर व्यक्त होत आहे. आमदार बाबुराव पाचर्णे, राहूल कुल व जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांची नाव प्रामुख्याने पालकमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com