मुख्यमंत्री म्हणाले विधानसभेवर भाजपचाच झेंडा....शिवसेनेचा नामोल्लेख टाळला...

मुख्यमंत्री म्हणाले विधानसभेवर भाजपचाच झेंडा....शिवसेनेचा नामोल्लेख टाळला...

लातूर : महाजनादेश यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच नामोल्लेख टाळला. त्यांनी आपल्या भाषणात एकदाही शिवसेना किंवा युतीचे सरकार याचाही उल्लेख केला नाही. उलट भाषणाच्या शेवटी विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार अशी घोषणा केली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती लढणार की स्वतंत्र लढणार या चर्चेला उधाण आले आहे.

राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी श्री. फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) येथे आली. रात्री पावसात त्यांची जाहीर सभा झाली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरु असलेली वाटचाल याचीही माहिती त्यांनी दिली.

अर्धा तास त्यांनी भाषण केले. यात त्यांनी एकदाही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही, किंवा युतीचे सरकार असेही म्हटले नाही. उलट भाषणाच्या शेवटी लातूरकरांचा जनादेश मोदींना आहे का?, मला आहे का?, पालकमंत्री निलंगेकरांना आहे का?, महापौरांना आहे का? असे प्रश्न उपस्थितांना विचारून होकार घेतला. तसेच तुमच्या जनादेशावर आता मुंबईला जावून विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावतो अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. युतीचा झेंडा फडकविला जाईल असेही ते म्हणाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळल्याने आता चर्चेला उधाण आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत युती होणार की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com