शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

शिवसेनेच्या53व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले असून त्यांचे मार्गदर्शनपर भाषण ही होणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

मुंबई : शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले असून त्यांचे मार्गदर्शनपर भाषण ही होणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

उद्या संध्याकाळी ६ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शीव येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्विकारत शिवसेना वर्धापन दिनाला येण्याचं मान्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीच्या रणनितीचं मार्गदर्शन ही यावेळी होणार आहे. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाही शिवसेना आणि भाजपाने एकदिलाने लढावी आणि मोठा विजय मिळवावा यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपिठावर येत आहेत. 

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वर्धापन दिनानिमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची आपली भूमिका उद्धव स्पष्ट करणार असल्याचे समजते आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com