नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार; जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ठाणे जिल्ह्याच्या विकासाबाबत आढवा घेण्यासाठी ठाकरे यांनी जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महापालिकांसह जिल्हापरीषदेच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला
Uddhav Thackeray Assures to Solve Navi Mumbai Pending Issues
Uddhav Thackeray Assures to Solve Navi Mumbai Pending Issues

नवी मुंबई  : सिडको, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांशी संबंधित असलेले प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सोडवण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

सोमवारी मंत्रालयात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांचे मालमत्ता कार्ड, सिडकोची फ्री होल्ड घरे, पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या घरांची पुर्नबांधणी, मरिना प्रकल्प, एपीएमसी मार्केटचे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रूपांतर, एसआरए आदी प्रश्‍न मांडून ठाकरे यांचे लक्ष वेधले.

ठाणे जिल्ह्याच्या विकासाबाबत आढवा घेण्यासाठी ठाकरे यांनी जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महापालिकांसह जिल्हापरीषदेच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या प्रसंगी उपस्थित राहून मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता कार्डचे वाटप झालेले नाही. हा मुद्दा म्हात्रे यांनी लावून धरला. 

तसेच सिडको आणि मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून बेलापूर येथे खाडी किनारी मरीना प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परंतु, अद्याप सिडकोतर्फे निवीदा प्रक्रीया राबवण्यात आली नाही. नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा अद्याप विकास करण्यात आलेला नाही. हे मुद्दे उपस्थित झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हे प्रश्‍न सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मरीना प्रकल्पाच्या निवीदा प्रक्रीया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांचा झोपडपट्टी पुर्नविकासाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. नवी मुंबईतील पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सिडकोनिर्मिती घरांवरील भाडेकरारही रद्द करून घरे सिडको मुक्त केली जाणार आहेत. तर एपीएमसीच्या मार्केटचाही आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com